रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत : रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:49 PM2024-04-15T17:49:58+5:302024-04-15T17:50:55+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, ...

Ratnagiri-Sindhudurga Grand Alliance seat decided in Delhi Parliamentary Board meeting says Ravindra Chavan | रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, त्या बैठकीत याेग्य ताे निर्णय हाेईल. या मतदारसंघात मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे महायुती म्हणून काम करतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या उद्घाटन साेहळ्याला महायुतीचे आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. उद्यापासून महायुतीचा उमेदवार नरेंद्र माेदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागेल. मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीने जे करावे लागेल ते सर्व याेजनाबद्ध करण्याबाबत या कार्यालयातून काम हाेईल, असे त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण आहे तर काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ असून, एका ठिकाणी शिटी ही निशाणी आहे. त्यामुळे महायुतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांना चिन्ह अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही वरिष्ठ मंडळी महायुतीला याेग्य ताे निर्णय घेतील, आम्हाला आवश्यक असणारे निर्णय ते नक्की घेतील. हा निर्णय लवकरच हाेणे अपेक्षित आहे. या उमेदवारीबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही उत्कंठा लागलेली आहे. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचेही मंत्री चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गात महायुतीचे मेळावे झाले त्याला महायुतीचे घटक पक्ष हाेते. रत्नागिरीतही कार्यकर्ते आणि त्यांच्यासाेबत असणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा महायुतीच्या पाठीशी आहेत. रत्नागिरीतील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे सर्वजण महायुतीचे काम करत आहेत. उदय सामंत यांच्याकडे पक्षाची माेठी जबाबदारी आहे. पक्षाकडून ज्याठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, त्याठिकाणी समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना वेळ देण्यास मिळत नाही. मात्र, याठिकाणची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात असल्याने १५ तारखेनंतर त्यांनी याठिकाणी एकत्रित मेळावे घेतले जातील असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri-Sindhudurga Grand Alliance seat decided in Delhi Parliamentary Board meeting says Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.