रत्नागिरी : जोडरस्ता खचल्यामुळे सोनवी पुलावरून एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:09 PM2018-08-30T15:09:55+5:302018-08-30T15:12:21+5:30
संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत.
देवरुख : संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत.
संगमेश्वर - देवरूख मार्गावरील हा पूल १९४७ साली बांधण्यात आला आहे. त्याच्या जोडरस्त्याला भेगा पडल्याचे आणि थोडा रस्ता खचल्याचे बुधवारी सायंकाळी तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही बाब तहसील कार्यालयाला कळवली.
तेथून पोलिसांना देण्यात आलेल्या सूचनांमुळे पोलिसांनी बॅरीकेट्स लावून खचलेल्या भागाच्या बाजूची वाहतूक बंद केली. आज गुरूवारी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली.
कोल्हापूरहून चिपळूणकडे जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. तसेच संगमेश्वर - देवरूख वाहतुकीचे प्रमाणही बरेच आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुजी करावी, अशी अपेक्षा केली जात आहे.