रत्नागिरी : भात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, आॅनलाईन पेमेंटची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:04 PM2018-03-21T17:04:21+5:302018-03-21T17:04:21+5:30

महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.

Ratnagiri: Small response to farmers selling paddy, online payment facility | रत्नागिरी : भात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, आॅनलाईन पेमेंटची सुविधा

रत्नागिरी : भात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, आॅनलाईन पेमेंटची सुविधा

Next
ठळक मुद्देभात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसादआॅनलाईन पेमेंटची सुविधा- आतापर्यंत केवळ ७ हजार क्विंटल भात खरेदी

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.

दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी भात खरेदी करण्यात येते. यावर्षीसाठी फेडरेशनला २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५५० रूपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.

सन २०१०पासून २०१४ पर्यंत केंद्रांचे गोदामभाडे थकल्यामुळे जिल्ह्यातील १६पैकी पाच केंद्रांवर गतवर्षी भात खरेदी झाली नव्हती. १६पैकी ११ केंद्रांवर ७७७ शेतकऱ्यांकडून एकूण ८ हजार ५५६ क्विंटल भात खरेदी करण्यात आले होते.

गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलला १४७० रूपये दर देण्यात आला होता, शिवाय २०० रूपये बोनस देण्यात आला होता. मात्र, यावर्षी बोनस देण्यात आलेला नाही. आतापर्यंत ७३८ शेतकऱ्यांकडून ७ हजार ९०.०५ क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे.

खेड तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रांवर १२९ शेतकऱ्यांनी १ हजार ९६३.२० क्विंटल, गुहागर तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रावर १११ शेतकऱ्यांनी ६७४ क्विंटल, लांजा तालुका खरेदी - विक्री संघ येथे ६ शेतकऱ्यांकडून २५.६०, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ केंद्रांवर ९९ शेतकऱ्यांकडून ८५८.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चिपळूण येथे ७० शेतकऱ्यांकडून ८७०.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मिरवणे/मार्गताम्हाणे केंद्रावर ३९ शेतकऱ्यांकडून ३०१.६० क्विंटल, आकले केंद्रावर ३७ शेतकऱ्यांकडून २७८ क्विंटल, शिरळ केंद्रावर १७ शेतकऱ्यांकडून १२२ क्विंटल, शिरगाव विविध कार्य सेवा सोसायटी लि. केंद्रावर १११ शेतकऱ्यांकडून १ हजार ६७.२० क्विंटल भात विक्री झाली आहे.

केळशी परिसर आंबा उत्पादक संघाच्या केंद्रावर ६६ शेतकऱ्यांनी ४६३.२० क्विंटल, राजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर ३ शेतकऱ्यांनी ४३.६५ क्विंटल भात विक्री केली आहे.

रास्तदर धान्य दुकानांवर होणार विक्री

मार्चअखेर भातखरेदी करण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या भाताच्या भरडाईसाठी ई - लिलाव केला जातो. भाताचा टप्प्याटप्प्याने लिलाव केला जात असल्याने २ हजार ७२८ क्विंटल भाताची भरडाई केली असून, १ हजार ५० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. रास्तदर धान्य दुकानातून या तांदळाची विक्री केली जाणार आहे.

८७ लाख ६४ हजार ६९२ रूपये वितरित

भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाईन पेमेंट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री करणाऱ्या केंद्रावर सातबारा, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक शिवाय बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड आदी माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. भात विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर पैसे आॅनलाईन जमा होणार आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करूनही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.

कमी भात विक्री

गतवर्षी ७७७ शेतकऱ्यांकडून ८ हजार ५५६ क्विंटल भातविक्री करण्यात आली होती. यावर्षीही गतवर्षीचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यावर्षी २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ७३८ शेतकºयांकडून ७०९०.०५ क्विंटल इतकेच भात विक्री करण्यात आले आहे.

लिलाव प्रक्रिया रखडल्याने विरोध दर्शविला होता

भात विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र, यावर्षी अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. २००९-१०मध्ये १५ हजार २४०.७३ क्विंटल, २०१०-११मध्ये १५ हजार २६०.२२ क्विंटल, २०११-१२मध्ये १८ हजार ७३१.७८ क्विंटल, २०१२-१३मध्ये २१ हजार ४८० क्विंटल, २०१३-१४मध्ये २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.

२०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षी भात खरेदी झालीच नाही. शासनाकडून लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे गोदाम मालकांनीच भात खरेदीसाठी नकार दर्शविला होता. परंतु गतवर्षी शासनाच्या परवानगीने भात खरेदी करण्यात आली.
 

Web Title: Ratnagiri: Small response to farmers selling paddy, online payment facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.