रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 03:46 PM2018-09-27T15:46:35+5:302018-09-27T15:48:51+5:30

सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

Ratnagiri: In the smart village, the first of the pandals will get a reward of Rs 40 lakhs | रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथमरत्नागिरी जिल्हा : ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

रत्नागिरी / पाचल : सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने ग्रामपंचायतीला भेट देऊन केलेल्या गुणांकानुसार पाचल ग्रामपंचायतीला स्वच्छतेत १४, व्यवस्थापनात १८, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणात २० पारदर्शकता व पर्यावरणात ९ असे एकून ७३ गुण मिळाले.

या ग्रामपंचायतीला यापूर्वी निर्मळ ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, स्वच्छता भारत मिशनअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्मार्ट ग्राम पाचलमधील सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्य विभाग, पाचल हायस्कूल, खापणे महाविद्यालय, पोलीस स्थानक, महावितरण कंपनी, सर्व बचत गट, सहकारी सेवा सोसायट्या आदींनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

स्मार्ट ग्रामसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिध्दार्थ जाधव, विनायक सक्रे, शंकर पाथरे, पूर्वा पाथरे, रजिया गडकरी, विजया तेलंग, श्रध्दा जाधव, मनीषा बेर्डे, तेजल सुतार यानी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Ratnagiri: In the smart village, the first of the pandals will get a reward of Rs 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.