रत्नागिरी : आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:03 PM2018-08-28T17:03:32+5:302018-08-28T17:05:27+5:30
खेड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
खेड : तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमोल कदम यांना दिले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गाच्या सवलती शासनाने तत्काळ लागू कराव्यात, समाजाला घटनेत नमूद केलेल्या अनुसूचिीा जमातीच्या केंद्र शासनाच्या यादीत क्रमांक ३६नुसार लागू केलेल्या सवलती महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
धनगर समाजाची शासनाने फसवणूक केली असल्याचा आरोप आयोजकांनी केला. त्यामुळे या समाजाचे शैक्षणिक, नोकरीत मोठे नुकसान झाले आहे.
झारखंड, तामिळनाडू, ओरिसा, उत्तरप्रदेश आदी राज्यात हा समाज अनुसूचित जमातीत आहे. महाराष्ट्रात हा समाज भटक्या जातीत गणला गेला आहे. धनगर समाज हा मुळातच पशुपालक असून, भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धडक मोचार्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.