रत्नागिरी : शारीरिक कवायतींसह विद्यार्थ्यांनी रचले मनोरे, ३५० विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:57 PM2018-03-17T12:57:38+5:302018-03-17T12:57:38+5:30

रत्नागिरी येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात ३५० विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती, सूर्यनमस्कार, लेझीम आणि चित्तथरारक मानवी मनोरे रचले. साधन व सामुदायिक कवायतींची प्रात्यक्षिकेही सर्वांनाच आवडली. निमित्त होते परशुरामपंत अभ्यंकर स्मृतिदिन आणि शाळेच्या वाढदिवसाचे. शुक्रवारी सकाळी दोन तास या कार्यक्रमाचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.

Ratnagiri: Students from physical education, including 350 children, | रत्नागिरी : शारीरिक कवायतींसह विद्यार्थ्यांनी रचले मनोरे, ३५० विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

रत्नागिरी : शारीरिक कवायतींसह विद्यार्थ्यांनी रचले मनोरे, ३५० विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

googlenewsNext
ठळक मुद्दे३५० विद्यार्थ्यांनी केले शारीरिक कवायती, सूर्यनमस्कारशारीरिक कवायतींसह विद्यार्थ्यांनी रचले मनोरे,

रत्नागिरी : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात ३५० विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती, सूर्यनमस्कार, लेझीम आणि चित्तथरारक मानवी मनोरे रचले. साधन व सामुदायिक कवायतींची प्रात्यक्षिकेही सर्वांनाच आवडली. निमित्त होते परशुरामपंत अभ्यंकर स्मृतिदिन आणि शाळेच्या वाढदिवसाचे. शुक्रवारी सकाळी दोन तास या कार्यक्रमाचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यामंदिर अशी ओळख असलेल्या शाळेचे डॉ. रामचंद्र अभ्यंकर यांच्या देणगीनंतर परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर असे नामकरण करण्यात आले. कै. अभ्यंकर हे विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय प्राथमिक शिक्षक होते, अशी माहिती यावेळी मुख्याध्यापक वि. बा. नारकर यांनी दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शलाका रेडीज, अभ्यंकर यांच्या स्नुषा वैदेही अभ्यंकर, कौन्सिल मेंबर जयंत प्रभुदेसाई, फाटक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी वायकुळ उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किलबिल या हस्तलिखिताचे प्रकाशन रेडीज यांनी केले.

तीन थरांचे मनोरे

यावेळी लेझीम, साधन कवायती, घुंगूरकाठी यासह विद्यार्थ्यांनी सुरेख मानवी मनोरे रचले. तीन थरांचे हे मनोरे लक्षवेधी ठरले. पालक प्रतिनिधी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लहान वयातच शरीर वळते, सूर्यनमस्कारामुळे बुद्धी प्रगल्भ होते व शरीर मजबूत होते. शाळेत दररोज विद्यार्थ्यांना याचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीमध्ये सहभाग घेऊन कवायती सादर केल्या.

Web Title: Ratnagiri: Students from physical education, including 350 children,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.