रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणीवर बढती

By शोभना कांबळे | Published: July 4, 2024 07:12 PM2024-07-04T19:12:32+5:302024-07-04T19:13:25+5:30

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. मात्र, रत्नागिरीचे ...

Ratnagiri Superintendent of Police Dhananjay Kulkarni has been promoted to the senior category | रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणीवर बढती

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणीवर बढती

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. मात्र, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून ते कार्यरत राहणार आहेत.

धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरीचे पाेलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीचे ज्वलंत आंदोलन त्यांनी अतिशय संयमाने आणि काैशल्याने हाताळले. जिल्ह्याची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाईल, याबाबत ते सदैव दक्ष राहतात. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हाभरात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्या.

अतिशय शांत, प्रसन्न आणि संयमी व्यक्तिमत्त्व असलेले पोलिस अधीक्षक यांची ही वरिष्ठ श्रेणी पदोन्नती आहे. त्यांच्या पदोन्नतीचे वृत्त बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हा मुख्यालयाकडे आले. त्यांची वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली असली तरीही त्यांच्याकडे रत्नागिरीचाच कार्यभार राहणार आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Ratnagiri Superintendent of Police Dhananjay Kulkarni has been promoted to the senior category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.