रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग फेम इंडियामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:37 PM2021-03-30T15:37:52+5:302021-03-30T15:39:12+5:30
Police Ratnagiri-रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय ह्यजिल्हा पोलीस अधीक्षक २०२१ह्ण च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक २०२१ च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी आपल्या जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील २०० पोलीस प्रमुखांची यादी विविध स्रोतांच्या आधारे आणि सर्वेक्षणाच्या आधारे फेम इंडिया मासिकाने आणि एशिया पोस्टने सर्व्हे केला.
त्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुधारणे, कार्यक्षम कार्यशैली, लोकाभिमुख प्रशासन, दूरदर्शीपणा आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या कसोटीवर या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्या २०० अधिकाऱ्यांपैकी ५० लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्यांची नावे फेम इंडियाने प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचा समावेश आहे.
डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात ई - एहसास मोहीम, आशा अभियान, जिल्ह्यातील अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोहीम, किनारपट्टी सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच बडी कॉप संकल्पनेतून रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे.