रत्नागिरी : शिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतर, प्रशासनाची धावपळ सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:54 PM2018-11-05T13:54:38+5:302018-11-05T13:55:38+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०१७-१८ मध्ये कमी पटसंख्येच्या ८८ प्राथमिक शाळांचे समायोजन अन्य शाळेत करुन त्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन शिक्षक कमी असलेल्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. हे
समायोजन करताना जिल्हा परिषदेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तालुक्यातच समायोजन करावे, अशी मागणी होती. मात्र, जिल्हा परिषदेने ५० शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर करण्याचे जाहीर केले होते. त्याला सर्वच शिक्षक संघटनानी जोरदार विरोध केला होता.
दरम्यान, या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार व्हाव्यात. कारण अगोदर तालुकास्तरावर नंतर जिल्हास्तरावर या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांची आहे. त्याचबरोबर शिक्षक बदल्या निम्मे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणार असल्याने अनेक शिक्षकांना कौटुंबिक अडचणी येणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने त्यांना निवेदनाद्वारे २२ आॅक्टोबर २०१८ चा शासन निर्णय रद्द करुन १८ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम तालुकास्तर व नंतर जिल्हास्तरावर बदल्या करण्याची मागणी केली होती.
शासनाने दिलेल्या दि. २२ आॅक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसारच बदल्या करण्याच्या हालचाली परिषद भवनात सुरु आहे. त्यामुळे शिक्षक बदल्या दिवाळीची सुट्टी संपल्यावर होणार असल्याचे निश्चित आहे.