रत्नागिरी : पालीनजीक महामार्गावर टेम्पो खाक, आगीमध्ये २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:19 PM2018-03-10T12:19:39+5:302018-03-10T12:23:59+5:30
मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.
पाली : मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.
देवरुख - साखरपा येथून मालवाहतूक करीत येणाऱ्या अशोक लेलॅण्ड दोस्त या ट्रकच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. चालकाच्या केबीनमधून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. त्यामुळे चालकाने तत्काळ महामार्गावर वाहन थांबवून बाहेर उडी मारली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संपूर्ण टेम्पोने पेट घेतला होता.
टेम्पो देवरुख - कोसुंब येथील अमित अनंत जाधव यांच्या मालकीचा होता. त्यावर सचिन गायकर (रा. देवरुख) हा चालक म्हणून होता. त्यांच्यासोबत प्रवीण अनंत जाधव हेही गाडीत होते.
प्रवीण जाधव या वाहनातून फरसाण व इतर खाद्यपदार्थांचे घाऊक वितरण करण्यासाठी पाली येथे येत होते. त्यामुळे ४०० किलोग्रॅम मालाचे ४० हजार रुपये इतकी किंमत होती. तसेच वाहनाचे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाली येथील पाणी विक्रेते संदेश सावंत पाण्याची गाडी घेऊन, महेश सरगर हे पाण्याच्या पंपासह घटनास्थळी आले. त्यानंतर प्रसन्न राऊत यांच्यासह पाली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल संजय झगडे, पोलीस नाईक मोहन पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या बंबानेही प्रयत्न केले.