Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​

By अरुण आडिवरेकर | Published: September 29, 2024 09:59 PM2024-09-29T21:59:52+5:302024-09-29T22:00:24+5:30

Ratnagiri News: पाेहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या पाेर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यात यश आले. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली.

Ratnagiri: Three drowned in Ganpatipule sea; Death of two, success in saving one | Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​

Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​

गणपतीपुळे - पाेहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या पाेर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यात यश आले. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली.

प्रदीप कुमार (३०, मूळ रा. ओडिशा) आणि महंमद युसूफ (२९, मूळ रा. उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (३०, रा. पश्चिम बंगाल) याला वाचविण्यात यश आले.

रविवारी सुटी असल्याने जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट मरीन कंपनीचे कर्मचारी दुपारी फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे आले होते. सायंकाळी प्रदीप कुमार, महंमद युसूफ आणि डाकुआ टुकुना हे तिघे किनाऱ्यावरील स्वच्छतागृह इमारतीच्या समाेर समुद्रात आंघाेळीसाठी उतरले हाेते. तिघांनीही समुद्रातील चाळ पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न घेता खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. आपण खाेल समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच तिघांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जीवरक्षक मयुरेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, अनिकेत राजवाडकर, स्वच्छतागृहाचे चालक निखिल सुर्वे यांच्यासह पाेलिस मदतीसाठी धावले.

त्यांनी तिघांना पाण्याबाहेर काढून तत्काळ उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल केले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून प्रदीप कुमार व महंमद युसूफ यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच डाकुआ टुकुना यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच जयगडचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस स्थानकांतर्गत गणपतीपुळे पोलिस करत आहेत.

Web Title: Ratnagiri: Three drowned in Ganpatipule sea; Death of two, success in saving one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.