रत्नागिरी :आजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:23 PM2018-08-16T20:23:09+5:302018-08-16T20:25:00+5:30
आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पथसंचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस, होमगार्ड, स्काऊट, एन. सी. सी., श्वान पथक, आदी पथकांनी संचलनात सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्त्व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण इंगळे यांनी केले.
वायकर पुढे म्हणाले की, पंचवार्षिक योजनेतून देशात रेल्वेचे जाळे विणले, खेड्यपाड्यांचा विकास केला, शिक्षणामध्ये प्रगती केली, महिलांचे सबलीकरण केले, उत्तम न्याय व्यवस्था दिली, निरक्षरता दूर करण्याचा प्रयत्न केला, दळणवळणाच्या सोयी केल्या.
देश घडवायचा असेल तर तळागाळापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचविणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत अनेक सेवा, सुविधा राज्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या प्रणय राहुल तांबे यांना जीवनरक्षा पदक पुरस्कार २०१७ने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचाही पोलीस महांसचालक पदक मिळल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या उत्कृष्ट लघु उद्योजक, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रत्नागिरी यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.