रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:02 PM2018-09-04T17:02:40+5:302018-09-04T17:05:37+5:30

रत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या इंगवले यांनी ५० मीटर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले आहे.

Ratnagiri: Topaz Ingwal bagged the gold medal in the National Shooting Championship | रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक

रत्नागिरी :  राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक५० मीटर रायफल प्रकारात विक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या इंगवले यांनी ५० मीटर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले आहे.

पुष्कराज इंगवले यांनी हिमांशू आर. यांचा विक्रम मोडत ५८९/६०० गुणांचा नवीन विक्रम नोंदविला आहे. राष्ट्रीय नेमबाज हिमांशू आर. यांनी २०११मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ५८५/६०० गुणांचा विक्रम नोंदविला होता.

गेल्या सात वर्षात विक्रम कोणी मोडले नव्हता. परंतु रत्नागिरीच्या पुष्कराज यांनी नुकत्याच झालेल्या चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेत हिमांशू यांच्यापेक्षा चार गुण अधिक मिळवून विक्रम मोडला आणि राष्ट्रीय खेळाडूमध्ये स्वत:चा नवा विक्रम नोंदविला आहे.

Web Title: Ratnagiri: Topaz Ingwal bagged the gold medal in the National Shooting Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.