Ratnagiri: कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू हाेताच पहिल्याच दिवशी चुकली ट्रेन, रत्नागिरीत प्रवाशांचा गोंधळ

By अरुण आडिवरेकर | Published: June 10, 2023 10:43 PM2023-06-10T22:43:30+5:302023-06-10T22:43:57+5:30

Ratnagiri: जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वे स्थानकात आल्यानंतर गाडी नवीन वेळेनुसार निघून गेल्याचे प्रवाशांना कळले. त्यानंतर प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातील तिकीटघराकडे माेर्चा वळवून गाेंधळ घातला.

Ratnagiri: Train missed on the first day of Konkan Railway's monsoon schedule, commuters panic in Ratnagiri | Ratnagiri: कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू हाेताच पहिल्याच दिवशी चुकली ट्रेन, रत्नागिरीत प्रवाशांचा गोंधळ

Ratnagiri: कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू हाेताच पहिल्याच दिवशी चुकली ट्रेन, रत्नागिरीत प्रवाशांचा गोंधळ

googlenewsNext

- अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरील बदलेल्या पावसाळी वेळापत्रकाचा फटका शनिवारी (१० जून) जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांना बसला. जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वे स्थानकात आल्यानंतर गाडी नवीन वेळेनुसार निघून गेल्याचे प्रवाशांना कळले. त्यानंतर प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातील तिकीटघराकडे माेर्चा वळवून गाेंधळ घातला.

मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेसची पावसाळ्यापूर्वीची वेळ सायंकाळी ६:१० अशी आहे. मात्र, पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आता ४:५५ वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकातून सुटली. ही गाडी मुंबईकडे रवाना झाल्यावर तिकिटावरील जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वेस्थानकात दाखल झाले. मात्र, गाडी रवाना झाल्याचे कळताच प्रवाशांनी गाेंधळ घातला.

प्रवाशांनी गाडीचे आरक्षण करताना त्या तिकिटावर पावसाळी वेळापत्रकानुसार वेळ नव्हती. या गोंधळात पन्नासहून अधिक प्रवाशांची गाडी चुकली. त्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकावरील तिकीट घराकडे धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांनीही तिकिटावरील वेळेची नोंद ही वरिष्ठपातळीवरून होत असल्याचे सांगत प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Ratnagiri: Train missed on the first day of Konkan Railway's monsoon schedule, commuters panic in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.