रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:30 PM2018-09-25T16:30:48+5:302018-09-25T16:36:59+5:30

रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते.

Ratnagiri: Twelfth Anniversary of Nirmalya compilation from the beach, spontaneous participation of students | रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभागमांडवी, भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनावेळी संस्था कार्यरत

रत्नागिरी : शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. अनंत चतुर्दशीला शहरातील मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो.

यावर्षी भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते.

गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाऱ्यावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते. शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, स्काऊट गाईड, हरित सेना पथक, फिनोलेक्स महाविद्यालय, जिद्दी माऊंटेनिअर्स तसेच नगर पालिकेचे कर्मचारी मिळून २५० मंडळी स्वच्छता उपक्रमात सहभागी झाली होती. स्वच्छता मोहिमेसाठी यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिद्द माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष धीरज पाटकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.

निर्माल्यापासून खत

रत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावर एक टन, तर भाट्ये किनाऱ्यांवर ३०० किलो मिळून सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. त्याचबरोबर गौरी गणपती विसर्जनावेळी मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले होते. भाट्ये येथील प्रादेशिक नारळ रोपवाटिका केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. त्यामुळे निर्माल्य तेथे देण्यात आले आहे.

Web Title: Ratnagiri: Twelfth Anniversary of Nirmalya compilation from the beach, spontaneous participation of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.