रत्नागिरी : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दारूने भरलेल्या दोन मारूती व्हॅन जप्त, राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:50 PM2017-12-29T14:50:39+5:302017-12-29T14:54:01+5:30
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) याठिकाणी विभागाने केलेल्या तीन कारवाईत दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रत्नागिरी : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) याठिकाणी विभागाने केलेल्या तीन कारवाईत दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चिपळूण तालुक्यातील फरशी तिठा येथे काल (गुरूवारी) रात्री केलेल्या कारवाईत संशयित आरोपी राजेश प्रभाकर हरचिलकर याच्या गाडीतून गोल्डन एस फाईन व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या भरलेले बॉक्स असे एकूण ५० बॉक्समधील ६०० प्लास्टिक बॉटल असा एकूण ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर त्याचठिकाणी केलेल्या दुसºया कारवाईत ओमनी चालक दीपक महादेव उत्तेकर (४०, कुरवळ-जावळी, ता. खेड) याच्याकडून १७ हजार ५०० रूपये किंमतीची ३५० मिली क्षमतेची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह १ लाख ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोंडमळा- सावर्डे येथे आज सकाळी ९.१० ते १०.१० यावेळेत सुनील सुभाष सावर्डेकर (३०, रा. निवाचीवाडी, चिपळूण) याच्या घराशेजारी गोवा मद्याची व गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने बसलेला होता. त्याला रंगेहात पकडून त्याच्या ताब्यातून २६ हजार ४०० रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लिटर मापाचे गावठी हातभट्टी दारूने भरलेले २ प्लास्टिक कॅन तसेच गोल्डन एस ७५० मिली क्षमतेच्या ४० बॉटल जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत तीन संशयित आरोपींकडून ३९० लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच ४८० मिली गोवा बनावटीचे विदेशी मद्द तसेच दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण रूपये ७ लाख ३१ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकामध्ये प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, खेडचे प्रभारी निरीक्षक महेश शेंडे, चिपळूणचे प्रभारी निरीक्षक मेहबूब शेख, दुय्यम निरीक्षक विनोद इंजे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, राजेंद्र भालेकर, जवान महादेव चौरे, अर्वद शेख, अतुल वसावे, निनाद सुर्वे, सावळाराम वड, संदीप विटेकर यांचा सहभाग होता.