रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:47 PM2019-02-20T23:47:06+5:302019-02-20T23:51:39+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप

Ratnagiri Vidhan Sabha constituency | रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

googlenewsNext
ठळक मुद्देसामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप यावेळीही समसमान झाले आहे. रत्नागिरी विधानसभेची ही जागा गेल्या १५ वर्षात भाजपला मानवली नाही. तरीही भाजपच्या वाट्याची ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह धरला जात असल्याने यावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

२००४ च्या विधानसभा निवडणूकीआधी रत्नागिरीच्या जागेवर भाजप आमदार विजयी झाले होते. मात्र २००४ नंतर या मतदारसंघात भाजपला मात देत त्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसमध्ये असलेले आमदार उदय सामंत हे विजयी झाले. २००९  मध्येही राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून उदय सामंत विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला व सेनेतर्फे पुन्हा ते रत्नागिरी मतदारसंघातून विजयी झाले. पुन्हा एकदा यावेळी सेनेतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. मात्र गेल्यावेळी विधानसभेत युती नव्हती. यावेळी युती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ युतीधर्मानुसार भाजपचा असल्याने तो भाजपलाच मिळावा म्हणून भाजपामधील काही नेते आग्रही आहेत.

या मतदारसंघात भाजपातर्फे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीची आधीपासून चर्चा होती. युती न झाल्यास हे प्रसाद लाड व उदय सामंत निवडणूक रिंगणात आमने सामने येतील अशीही चर्चा होती. आता युती झाली आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या वाट्याला आलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळावा, असा आग्रह स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे धरला जात आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रीक करणाºया आमदार उदय सामंत यांचे सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  घनिष्ठ संबंध आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. स्थानिक पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्याशीही सामंत यांचे संबंध चांगले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरील हक्क सांगण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला तरी सामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

समिकरणे बदलणार!
लोकसभेची निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार आहे. राज्य विधानसभेची निवडणूक २०१९ च्या अखेरीस होणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. मात्र काहीही झाले तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी राजकीय बस्तान चांगले बसविल्याने त्यांच्या उमेद्वारीला धोका नाही, अशीही चर्चा आहे.

Web Title: Ratnagiri Vidhan Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.