रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता, पोलिस दलाकडून शस्त्र सलामी
By मेहरून नाकाडे | Published: March 30, 2024 03:56 PM2024-03-30T15:56:45+5:302024-03-30T15:57:01+5:30
रत्नागिरी : होळी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची शनिवारी (दि.३० मार्च) रोजी सांगता झाली. ...
रत्नागिरी : होळी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची शनिवारी (दि.३० मार्च) रोजी सांगता झाली. श्रीदेवी जुगाईच्या भेटीला जाण्याआधी भैरीबुवाला पोलिस दलाकडून शस्त्र सलामी देण्यात आली.
झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान असलेली पालखी रविवारी दुपारी एक वाजता रंग खेळण्यासाठी सहाणेवरून उठली. पालखी उठल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर रंगाची उधळण केली. प्रथेप्रमाणे पोलिस कर्मचाऱ्यांनी ग्रामदेवतेला शस्त्र सलामी दिली.
पोलिसांची सलामी घेऊन सावंत-खोत वठारातून श्री जोगेश्वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरून गाडीतळ येथे आली.