Ratnagiri: वडील रागावले म्हणून जंगलात गेलेल्या मुलीला 'विराट'ने शोधले

By मनोज मुळ्ये | Published: September 30, 2023 01:17 PM2023-09-30T13:17:39+5:302023-09-30T13:18:03+5:30

Ratnagiri News: वडील रागावले म्हणून घर सोडून जंगलात निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या श्वान पथकातील 'विराट'च्या मदतीने शोधून काढण्यात यश आले आहे. ही घटना अलोरे शिरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.

Ratnagiri: 'Virat' finds the girl who went to the forest because her father was angry | Ratnagiri: वडील रागावले म्हणून जंगलात गेलेल्या मुलीला 'विराट'ने शोधले

Ratnagiri: वडील रागावले म्हणून जंगलात गेलेल्या मुलीला 'विराट'ने शोधले

googlenewsNext

- मनोज मुळ्ये
चिपळूण - वडील रागावले म्हणून घर सोडून जंगलात निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या श्वान पथकातील 'विराट'च्या मदतीने शोधून काढण्यात यश आले आहे. ही घटना अलोरे शिरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.

एक अल्पवयीन मुलगी नेहमी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून शाळेत जात असल्याने तिचे वडील तिला रागावले. त्यामुळे घाबरून ही मुलगी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून पळून गेली. ती पेढांबे येथील जंगलात निघून गेली असल्याचा अंदाज होता.

आपली मुलगी घरात न सापडल्याने तसेच आसपास तिचा शोध न लागल्याने तिच्या वडिलांनी अलोरे शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मुलीचे नातेवाईक आणि पोलिसांनी तिला शोधण्यासाठी जंगलात लगेचच शोध मोहीम राबवली. मात्र त्या रात्री तिचा शोध लागला नाही.

शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे अलोरे शिरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी रत्नागिरी येथील श्वान पथकाची मदत मागवली. दुपारी चार वाजता श्वानपथकातील 'विराट' या श्वानाला मुलीचा मुलीच्या टी-शर्टचा गंध देण्यात आला. त्याच क्षणी त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलात धाव घेतली आणि काही वेळातच त्याने पोलिस आणि नातेवाईकांना त्या मुलींच्या समोर नेऊन उभे केले. सदर मुलीचे समुपदेशन करून आणि तिची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या नातेवाईकांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्यासह श्वान विराट, त्याला हाताळणारे हवालदार महेश हरचिरकर, संदेश कोतवडेकर, चालक हवालदार संभाजी घोगरे, पोलिस उपनिरीक्षक पवार, चालक हवालदार दीपक ओतारी तसेच मुलीचे सर्व नातेवाईक सहभागी झाले होते.

Web Title: Ratnagiri: 'Virat' finds the girl who went to the forest because her father was angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.