रत्नागिरी : वन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:26 PM2018-05-11T14:26:31+5:302018-05-11T14:26:31+5:30

कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपाहारगृहे बंदच पडली आहेत.

Ratnagiri: Will the vintage banquets in Konkan begin with the forest department? | रत्नागिरी : वन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार?

रत्नागिरी : वन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार?

googlenewsNext
ठळक मुद्देवन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार? कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळीतील उपाहारगृहांना सद्यस्थितीत टाळे

चिपळूण : कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपाहारगृहे बंदच पडली आहेत.

राज्यात नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत समावेश असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्थापन झालेली ही उपाहारगृहांची योजना खाद्याची कमतरता आणि जागेच्या अडचणीमुळे गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून कोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धनाबरोबरच त्यासाठीची पूरक वातावरण निर्मिती आणि डायक्लोफिनॅक औषधांवरील बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी बहुतांश भागात गिधाडांचा वावर होता. मात्र, १९९०पासून त्यांच्या संख्येत अचानकपणे घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोकणातील संपूर्ण परिसराचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार यानुसार २००२मध्ये सर्वप्रथम दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची घरटी आणि पक्षी आढळले. त्यामुळे या ठिकाणापासून संवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरूवात झाल्यावर २००६पर्यंत जिल्ह्यात ७ घरटी आणि १४ पक्ष्यांची वाढ दिसली. मात्र, त्यानंतर त्यामध्ये वाढ न होता, श्रीवर्धन व चिरगाव येथे वसाहती आढळल्या होत्या.

यापूर्वी कोकणात यापेक्षाही अधिक गिधाडांच्या वसाहती आढळून आलेल्या आहेत. मात्र, जनावरांना झालेली बोटूलिझमची लागण, जनावरे कत्तलखान्यात पाठवण्याचे वाढलेले प्रमाण, मृत जनावरे जमिनीत पुरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे खाद्याअभावी गिधाडांच्या संख्येला ब्रेक लागला आहे.

निसर्गातील सफाई कर्मचारी

गिधाडे ही निसर्गातील सफाई कर्मचारी असतात. गिधाडे ही अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरती पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांसाचे लचके तोडणे त्यांना सहज शक्य होते.

जनावरांचे प्रमाण कमी

पूर्वी जनावरे मृत झाली की, ती उघड्यावर टाकली जात असत. मात्र, आता कोकणात पशुपालन हा उद्योगच संकटात आला आहे. त्यामुळे जनावरांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचाही परिणाम गिधाडांवर झाला आहे.

गिधाडांच्या अनेक जाती

गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींची गिधाडे ही मृतदेहावरच अवलंबून असतात. तरी या सर्व जाती एकमेकांच्या सहाय्याने काम करत असतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य ते सहज हेरू शकतात.

राज गिधाडावर नजर

बहुतेक गिधाडांची राज गिधाडावर नजर असते. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराचवेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृत प्राण्याची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्ष: फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.

प्रजाती नष्ट होण्याची भीती

भारतात गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु, गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की, आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भीती पक्षी निरीक्षक व सर्व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचं खाद्य कमी झालेलं नाही.

औषधे, रसायनांचा फटका

गिधाडांच्या संख्येला मुख्य फटका बसला आहे तो औषधे व रसायनांचा. पाळीव प्राण्यांना ह्यडायक्लोफिनॅकह्ण नावाचे औषध देतात. हे औषध घेतलेले मेलेले प्राणी खाल्ल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याधी होऊन ती मरतात. भारत सरकारने या औषधावर बंदी आणली आहे.

Web Title: Ratnagiri: Will the vintage banquets in Konkan begin with the forest department?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.