रत्नागिरी : संगमेश्वरनजीक एसटीला अपघात, २५ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:34 AM2018-12-28T11:34:00+5:302018-12-28T11:46:27+5:30
संगमेश्वर तालुक्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा गाडीवरील ताबा सुटून गाडी तीन पलट्या मारून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्यादरम्याने घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य २५ प्रवासी या अपघातामध्ये जखमी आहेत. धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा गाडीवरील ताबा सुटून गाडी तीन पलट्या मारून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्यादरम्याने घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य २५ प्रवासी या अपघातामध्ये जखमी आहेत. धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
निवळी - संगमेश्वर (एमएच १४, बीटी २४३२) ही वस्तीची एसटी बस चालक किरण सुतार (रा. इस्लामपूर) हे निवळीहून संगमेश्वरकडे घेऊन जात होते. या गाडीत वाहक मनोहर शिवराम भिड (रा. संगमेश्वर)हे होते. सकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्याने गाडीवरील ताबा सुटल्याने नायरी निवळी घाटात एसटी बसने तीन पलट्या मारल्या.
या गाडीतून शाळेचे विद्यार्थीदेखील प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना घाटातून बाहेर काढण्यासाठी धाव घेतली आहे. अद्याप प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जात आहे.