रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:13 AM2019-06-03T11:13:34+5:302019-06-03T11:14:50+5:30

ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.

Ratnagiri Zilla Parishad: Rs 3 crore for the rest house of the house | रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ३९ कोटी घरपट्टीची वसुलीकारखानदारीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.

रत्नागिरीजिल्हा परिषदेला घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत.

त्यामध्ये रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.

दरम्यान, डोंगरदऱ्यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींमध्ये सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.

सन २०१६-१७च्या ४ कोटी ८२ लाख २६ हजार २४८ रुपये थकीत असलेल्या घरपट्टीपैकी ४ कोटी ४ लाख ३७ हजार ५५७ रुपये वसुली, सन २०१७-१८ च्या ३९ कोटी ९० लाख ३ हजार ५४८ रुपयांपैकी ३६ कोटी ३ लाख ९३ हजार २०८ रुपये घरपट्टीची वसुली करण्यात आली़.

जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला ४३ कोटी ४५ लाख ६४ हजार ७७९ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये वसुली करण्यात आली.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकीत रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये एवढी थकबाकी वसूल करायची आहे.

Web Title: Ratnagiri Zilla Parishad: Rs 3 crore for the rest house of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.