रत्नागिरीकरांना दोन दिवस पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:43+5:302021-04-02T04:33:43+5:30
रत्नागिरी : नगरपरिषदेच्या शीळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा व नवीन पम्पिंग यंत्रणा बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. या ...
रत्नागिरी : नगरपरिषदेच्या शीळ जॅकवेल या मुख्य पाणीपुरवठा व नवीन पम्पिंग यंत्रणा बसविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. या कामासाठी रत्नागिरी शहरास हाेणारा पाणीपुरवठा ५ व ६ एप्रिल २०२१ असा दाेन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरवासीयांना पाण्याची गरजही वाढताना दिसत आहे. सध्या शहराला शीळ व पानवल या दोन धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. शीळ धरणातून होणारा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत होताना दिसतो. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी परवड रोखण्यासाठी नव्याने सुधारित नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. पम्पिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शहरातील पाणीपुरवठा दिनांक ५ व ६ एप्रिल २०२१ असे दोन दिवस बंद राहणार आहे. दिनांक ७ एप्रिल २०२१ पासून नियमित वेळेवर पाणीपुरवठा हाेणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी दाेन दिवस पुरेल एवढा पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.