रत्नागिरीच्या अनिरुध्दची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटनसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:29 AM2021-03-19T04:29:56+5:302021-03-19T04:29:56+5:30
१८०३२०२१आरटीएन०१.जेपीजी .................. लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुध्द योगेश मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन २०२१ ...
१८०३२०२१आरटीएन०१.जेपीजी
..................
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुध्द योगेश मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन २०२१ या जागतिक स्तरावरच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे.
ऑल इंग्लंड ओपन २०२१ ही स्पर्धा दि. २१ मार्चपासून बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीतील डॉ. योगेश मयेकर यांचा मुलगा अनिरुध्द भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत २६५ क्रमांकावर असलेल्या तसेच पुरुष दुहेरीच्या वर्ल्ड टूर रँकिंगमध्ये ७१ व्या क्रमांकावर असलेल्या वीस वर्षीय अनिरुध्दने आतापर्यंत पाच स्पर्धा जिंकल्या आहेत.
लहानपणापासूनच अनिरुध्दने अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा, राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले आहे. कुटुंबियांचे पाठबळ त्याला लाभत आहे. परिश्रम आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय टीममध्ये आपले स्थान मिळवले आहे.