आर्यन पाटीलला रत्नसिंधू गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:41+5:302021-03-19T04:30:41+5:30
महिलांचा सत्कार मंडणगड : घाणेखुंट जिल्हा परिषद शाळेत कर्तृत्ववान महिला व आदर्श केंद्रप्रमुखांचा सत्कार आणि प्रशालेस पुस्तके देणगीरूपाने देण्याचा ...
महिलांचा सत्कार
मंडणगड : घाणेखुंट जिल्हा परिषद शाळेत कर्तृत्ववान महिला व आदर्श केंद्रप्रमुखांचा सत्कार आणि प्रशालेस पुस्तके देणगीरूपाने देण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास लोटे केंद्राचे प्रमुख बाबाजी शिर्के, माजी सरपंच दर्शना धापसे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिया बैकर, मुख्याध्यापिका मधुरा बेंदरकर, शिक्षिका संजीवनी चव्हाण, शिक्षक सुनील तांबे, तानाजी खरात, शाम लोखंडे उपस्थित होते.
दापोलीत डेमो हाऊस योजनेचा शुभारंभ
दापोली : ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या महाआवास अभियान योजनेच्या डेमो हाऊस योजनेचा शुभारंभ पंचायत समितीच्या आवारात आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती रऊफ हजवानी, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, नगराध्यक्षा परवीन शेख, पंचायत समिती सदस्या वैशाली सुर्वे, स्नेहा गोरिवले, सहायक गटविकास अधिकारी सुवर्णा बांगल, प्रभारी उपअभियंता मनीषा कदम उपस्थित होते.
‘एलटीटी’चे स्मरणचित्र चित्रकला स्पर्धेत यश
खेड : खेड युवा फोरमतर्फे आयोजित स्मरणचित्र चित्रकला स्पर्धेत एलटीटी स्कूलच्या प्रचित गुहागरकर याने प्रथम, पीयूष पवार याने द्वितीय, तर इशा पवार हिने तृतीय क्रमांक पटकावला. कलाशिक्षक चेतन भाट, एच. आर. कुडवसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर गुहागरकर, समन्वयक सेबास्टियन जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग उपस्थित होते.
तिरुअनंतपुरम : निजामुद्दीन कोकण मार्गावर धावणार
खेड : कोकण मार्गावर तिरुअनंतपुरम निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्णपणे आरक्षित असणारी ही सुपरफास्ट स्पेशल पुढील सूचना मिळेपर्यंत ७ एप्रिलपासून धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तिरुअनंतपुरम येथून दर बुधवारी दुपारी २.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता निजामुद्दीनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी निजामुद्दीन येथून रात्री १०.१५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता तिरुअनंतपुरमला पोहोचेल. २२ डब्यांची ही गाडी वसईमार्गे धावणार आहे. कोकण मार्गावर या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पेडणे आदी स्थानकांवर थांबे दिले आहेत.
ज्ञानदीपमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केली.