ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:25+5:302021-07-04T04:21:25+5:30
आबलोली : ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे करण्यात आली आहे. ...
आबलोली : ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्यात आंदाेलन करण्यात आले. चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघातर्फे ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन चिपळूण तहसीलदार आणि रत्नागिरी तहसीलदार यांना देण्यात आले.
चिपळूण तहसीलदार यांना निवेदन देताना प्रभारी अध्यक्ष गजानन महाडिक, कार्याध्यक्ष विनोद झगडे, श्रीकृष्ण राऊत, शिल्पा महाडिक, रवींद्र लांजेकर, शांताराम झगडे, जगदीश राऊत, श्रद्धा राऊत उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, रत्नागिरी तालुकाध्यक्ष संदीप नाचणकर, भंडारी समाजाचे राजीव कीर, तालुकाध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, खजिनदार सुरेश निंबाळकर, जिल्हा सल्लागार अनंत भडकमकर, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना लांजेकर, सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष लांजेकर, सेवा आघाडी कार्याध्यक्ष काशिनाथ सकपाळ, तालुका उपाध्यक्ष सचिन कोतवडेकर, रत्नागिरी तालुका सचिव अविनाश चव्हाण, राजापूर तालुका सचिव किरण तुळसवडेकर, जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्य सुवर्णा पावसकर उपस्थित हाेते.