जगणं समृद्ध हाेण्यासाठी वाचन गरजेचे : धीरज वाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:25+5:302021-04-02T04:32:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क असगाेली : नुसतं छापलेलं वाचन म्हणजेही वाचन नव्हे. पूर्वी माणूस निसर्ग वाचायचा, आजही वाचतो. आपण हे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
असगाेली : नुसतं छापलेलं वाचन म्हणजेही वाचन नव्हे. पूर्वी माणूस निसर्ग वाचायचा, आजही वाचतो. आपण हे समजून घ्यायला हवे आहे. मानवी जगणं समृद्ध होण्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे, असे मत पर्यटन व पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
मार्गताम्हाने (ता. चिपळूण) येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात ‘भरारी’ वार्षिक अंकाचे पर्यटन व पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.
यावेळी व्यासपीठावर मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष जयसिंग मोरे, प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत, संचालक कृष्णकांत चव्हाण, संदीप गोखले, डॉ. शांतीलाल रावळ, प्रा. राजश्री कदम, प्रा. विकास मेहेंदळे, नॅक समन्वयक डॉ. एस. डी. सुतार, समन्वयक डॉ. एन. बी. डोंगरे, डॉ. संगीता काटकर, डॉ. सत्येंद्र राजे उपस्थित होते.