बंडखोर रमेश कदम स्वगृही

By Admin | Published: July 14, 2014 12:10 AM2014-07-14T00:10:42+5:302014-07-14T00:12:27+5:30

पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याचा दावा : कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार

Rebellious Ramesh Kadam Owner | बंडखोर रमेश कदम स्वगृही

बंडखोर रमेश कदम स्वगृही

googlenewsNext

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांची होणारी घुसमट यामुळे आपण वर्षभरापूर्वी या पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी आता भविष्यात योग्य सन्मान देण्याचे आश्वासन दिल्यानेच आपण पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज, रविवारी येथे सांगितले.
जयेश येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे रायगड मतदारसंघातून तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यात अपयश आले. मात्र, संगमेश्वर, चिपळूण मतदारसंघांतील कार्यकर्ता संभ्रमात होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या पुढाकाराने तटकरेंना घेऊन मुंबईमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा झाली. अन्यायाचे निराकरण करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. पुन्हा पक्षात सक्रिय व्हा, असे ज्येष्ठांनी सांगितले. त्यांचा सन्मान ठेवून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात मुंबई येथे पक्षश्रेष्ठींची बैठक होणार असून, या बैठकीत आपण सन्मानाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची धुरा सांभाळणार आहोत. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती खंबीरपणे पार पाडणार आहे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Rebellious Ramesh Kadam Owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.