न्यूमोनियापासून बालकांचे रक्षणासाठी ११०० डोस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:54+5:302021-07-17T04:24:54+5:30

रत्नागिरी : न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिजायटिसपासून बालकांचे रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लस जिल्ह्यातील बालकांना ...

Received 1100 doses to protect children from pneumonia | न्यूमोनियापासून बालकांचे रक्षणासाठी ११०० डोस प्राप्त

न्यूमोनियापासून बालकांचे रक्षणासाठी ११०० डोस प्राप्त

Next

रत्नागिरी : न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिजायटिसपासून बालकांचे रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लस जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी १,१०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या दालनात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लसीकरण कार्यक्रमासंदर्भात बैठक झाली. यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी योगेश जवादे, डॉ. दिलीप माने, डॉ. चंद्रकांत शेरखाने, डॉ. दिनेश सुतार, डॉ. सतीश गुजलवार आदी उपस्थित होते.

न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा नियमित लसीकरणात समावेश करण्यात आलेला आहे. ही लस न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिजायटिसपासून बालकांचे रक्षण करते. न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लस ही अतिशय सुरक्षित असून, दीड महिना, साडेतीन महिने आणि ९ महिन्यापर्यंतच्या बालकांना देण्यात येणार आहे. इतर कोणत्याही लसीप्रमाणे ही लस दिल्यावर बालकाला सौम्य ताप येऊ शकतो किंवा इंजेक्शन टोचलेली जागा लालसर होऊ शकते.

जेव्हा बालकाला पीसीव्ही लस देण्यात येईल, त्याचवेळी वेळापत्रकानुसार लागू असलेल्या अन्य लसीही देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्याला १,१०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यांचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले. डॉ. जाखड यांनी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन नियमित लसीकरणात समावेश करण्यात येत असल्याचे सांगितले. पीसीव्ही ही देण्यात येणारी लस विनामूल्य असल्याचे सांगून नागरिकांनी आपल्या बालकांना ती द्यावी, असे आवाहन डॉ. जाखड यांनी केले.

Web Title: Received 1100 doses to protect children from pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.