खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार केंद्र म्हणून मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:14+5:302021-04-20T04:33:14+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने शासकीय रुग्णालये कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर ...

Recognize private hospitals as corona treatment centers | खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार केंद्र म्हणून मान्यता द्या

खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार केंद्र म्हणून मान्यता द्या

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने शासकीय रुग्णालये कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य निकषांआधारे पूर्ण उपचार पद्धतीसाठी खासगी रुग्णालयांना अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे करण्यात आली आहे.

या पत्रात, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्यामानाने बेड्सची कमतरता, शासकीय रुग्णालयातील अपुरी कर्मचारी संख्या, काही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, यातून रुग्णांची परवड होत आहे. इतर जिल्ह्यातही बेड्सची उपलब्धता नाही. तरी खासगी रुग्णालयांना योग्य नियमांआधारे रितसर पूर्ण उपचार सेवेला प्राधान्याने अधिकृतपणे 'डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल' म्हणून मान्यता देण्यात यावी, असे म्हटले आहे.

पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासून समविचारी शासकीय आरोग्य यंत्रणेतील अपेक्षित सुविधा सुचवित आला आहे. तरीही काही बदल झाले नाहीत. ज्या खासगी आस्थापना सेवा देण्यास स्वेच्छेने तयार आहेत, तिथे योग्य पडताळणी करून अशा रुग्णालयांना मान्यता देण्यात यावी. परजिल्ह्यात जाऊन उपचार घेणे महागडे होत असून खासगी रुग्णालयांना मान्यता देऊन स्थानिक स्तरावर व्यवस्था झाल्यास रुग्णांच्यादृष्टीने हितकारक ठरेल, असेही समविचारीने या पत्रात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सादर केलेल्या पत्रावर समविचारीचे बाबा ढोल्ये,राज्य महासचिव श्रीनिवास दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवाध्यक्ष ॲड. नीलेश आखाडे, तालुकाध्यक्ष आनंद विलणकर आदींंच्या सह्या आहेत.

Web Title: Recognize private hospitals as corona treatment centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.