फिनोलेक्स ॲकॅडमीचा सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:59+5:302021-04-16T04:30:59+5:30
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि आय. टी. क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रेड हॅट इंडिया प्रायव्हेट ...
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि आय. टी. क्षेत्रातील अग्रगण्य
कंपनी रेड हॅट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराद्वारे अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असलेल्या महाविद्यालयातील सेंटरमधून ग्लोबल दर्जाचे रेड हॅट प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी कंपनीच्या अधिकारी कविता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, एम. सी. ए. विभाग प्रमुख प्रा. तेजस जोशी, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. किशोर भोसले व त्यांचे सहकारी प्रा. अतुल यादव उपस्थित होते.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व एम. सी. ए. विभागाचे प्रा. किशोर भोसले, एम. सी. ए. विभागाचे प्रमुख प्रा. तेजस जोशी यांनी हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. हा सामंजस्य करार यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद व रजिस्ट्रार गजानन तारगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.