शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज

By admin | Published: December 24, 2014 11:20 PM2014-12-24T23:20:45+5:302014-12-25T00:05:42+5:30

लांजा नगरपंचायत : छाननीत आठ उमेदवारांचे अर्ज बाद

The record for the last day | शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज

शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज

Next

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १७ जागांसाठी ९२ उमेदवार रिंगणात उतरले असून, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक ६५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान १८ जानेवारी रोजी होणार आहे. दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मंगळवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने शिवसेना संघटनेच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केले. उर्वरित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व अपक्ष अशा एकूण ६५ उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चार दिवसांत एकूण ९२ उमेदवारांनी १२३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याच्या दिवसापासून म्हणजे दि. १८ डिसेंबरपासून अर्ज घेऊन जाण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. मात्र, पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. दुसऱ्या दिवशी १९ डिसेंबर रोजी ५ उमेदवारी अर्ज दाखल केले. २० रोजी ९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. २२ रोजी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर शेवटच्या दिवशी दि. २३ रोजी सर्वाधिक ६५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण १२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
लांजा नगरपंचायत प्रभागनिहाय अर्ज व उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग १ मधून ५ उमेदवारांनी ७ उमेदवारी अर्ज, प्रभाग २ मधून ६ उमेदवारांनी ७ उमेदवारी अर्ज, प्रभाग क्र.३ मधून ५ उमेदवारांनी ६ उमेदवारी अर्ज, प्रभाग क्र.४ मधून ७ उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज, प्रभाग ५ मधून ६ उमेदवारांनी ११ अर्ज, प्रभाग ६ मधून ३ उमेदवारांनी ५ अर्ज, प्रभाग ७ मधून ४ उमेदवारांनी ५ अर्ज, प्रभाग ८ मधून ६ उमेदवारांनी ६ अर्ज, प्रभाग ९ मधून ७ उमेदवारांनी ९ अर्ज, प्रभाग १० मधून ४ उमेदवारांनी ४ अर्ज, प्रभाग ११ मधून ६ उमेदवारांनी ७ अर्ज, प्रभाग १२ मधून ६ उमेदवारांनी १० अर्ज, प्रभाग १३ मधून ११ उमेदवारांनी १४ अर्ज, प्रभाग १४ मधून ४ उमेदवारांनी ७ अर्ज, प्रभाग १५ मधून ३ उमेदवारांनी ३ अर्ज, प्रभाग १६ मधून ५ उमेदवरांनी ८ अर्ज, प्रभाग १७ मधून ४ उमेदवारांनी ५ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे. (प्रतिनिधी)


आठजणांचे अर्ज बाद
बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत पक्षाचे ए. बी. फॉर्म न दिल्याने एकूण सातजणांचे अर्ज बाद करण्यात आले, तर एका महिला उमेदवाराला तीन अपत्ये असल्याने तिचा अर्ज बाद करण्यात आला. संपदा शेट्ये यांचा तीन अपत्ये असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. श्रध्दा गुरव यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्याने बाद झाला. उर्वरित सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले असले तरी त्यांनी अन्य एक अर्ज भरलेला असल्याने ते अजूनही निवडणूक रिंणात आहेत.

Web Title: The record for the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.