मनोरंजन, जलतरण, व्यायामशाळा, प्रार्थनास्थळे बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:06+5:302021-04-07T04:32:06+5:30

- चित्रपट, मालिका, जाहिराती यांच्या चित्रीकरणास काही अटींवर परवानगी मिळेल. जास्त कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृश्याच्या चित्रीकरणाला मनाई ...

Recreation, swimming, gym, places of worship will be closed | मनोरंजन, जलतरण, व्यायामशाळा, प्रार्थनास्थळे बंद राहणार

मनोरंजन, जलतरण, व्यायामशाळा, प्रार्थनास्थळे बंद राहणार

Next

- चित्रपट, मालिका, जाहिराती यांच्या चित्रीकरणास काही अटींवर परवानगी मिळेल. जास्त कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृश्याच्या चित्रीकरणाला मनाई राहील.

- रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स यामधून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेमध्ये पार्सल तसेच घरपोच सुविधा या सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहतील. कोणत्याही नागरिकास या सेवा घेण्यासाठी रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही. हॉटेलमध्ये रहिवासाकरिता उतरलेल्या पाहुण्यांसाठी फक्त हॉटेलमधील रेस्टॉरंट आणि बार सुरू राहतील. बाहेरील पाहुण्यांसाठी, या सेवेचा लाभ देता येणार नाही. १० एप्रिलपासून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही किंवा लसीकरण केलेले नाही अशा कामगार वर्गाने घरपोच सेवा दिल्यास त्यांना १००० रुपये दंड आणि संबंधित आस्थापनेकडून १०००० रुपये दंड वसूल केला जाईल.

- सर्वधर्मीय धार्मिक / प्रार्थनास्थळे बंद राहतील. मात्र, धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. कोणत्याही बाहेरील भक्‍तास प्रवेश असणार नाही.

Web Title: Recreation, swimming, gym, places of worship will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.