रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By शोभना कांबळे | Published: July 5, 2023 07:27 PM2023-07-05T19:27:38+5:302023-07-05T19:27:54+5:30

रत्नागिरी : बुधवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने गुरूवारी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्टचा इशारा जाहीर ...

Red alert in Ratnagiri district, appeal to citizens to be alert | रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

googlenewsNext

रत्नागिरी : बुधवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने गुरूवारी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्टचा इशारा जाहीर केला आहे. या अनुषंगाने संबधित यंत्रणांनी सावधानतेच्या व सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यरत रहावे तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या संदेशानुसार ७ ते ९ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयाला ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आलेला आहे. या दिवशी जिल्हयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच गुरूवार, दि. ६ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हयासाठी ‘रेड अलर्ट’ वर्तविण्यात आला आहे. या दिवशी जिल्हयातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

या अलर्टच्या अनुषंगाने संबधित यंत्रणांनी सावधानतेच्या व सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यरत रहावे तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

Web Title: Red alert in Ratnagiri district, appeal to citizens to be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.