वाहनांची गर्दी थांबल्याने प्रदूषणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:52+5:302021-04-17T04:31:52+5:30
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता, संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहने थांबली आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक ...
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता, संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहने थांबली आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आल्याने नागरिक सध्या घरीच आहेत. परिणामी वाहनांच्या धुरापासून होणाऱ्या हवेतील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.
वाहनांच्या वर्दळीमुळे कार्बनडाय ऑक्साईड वायू उत्सर्जित होतो. हवेत धुळीबरोबर वायू प्रदूषणाचा त्रास मानवी शरीरावर होतो. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच इंधन देण्याची सूचना शासनाने केली आहे. शिवाय विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने नागरिकांचे रस्त्यावर येणे कमी झाले आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिकांनी आपापली वाहने सुरक्षित लावून ठेवली आहेत. शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आल्याने मोजकीच वाहने बाहेर असली तरी, जेमतेम दोन ते तीन टक्केच वाहने रस्त्यावर आहेत. त्यामुळे प्रदूषण मात्र थांबले आहे.