Lok Sabha Election 2019 : कोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:39 PM2019-03-28T12:39:54+5:302019-03-28T12:42:26+5:30

कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन - चार दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समर्थकांमधून देण्यात आली.

Refineries in Konkan region | Lok Sabha Election 2019 : कोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यात

Lok Sabha Election 2019 : कोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यात

Next
ठळक मुद्देकोकणातील रिफानयरीसमर्थक लोकसभा आखाड्यातदोन-चार दिवसांत उमेदवाराच्या नावाची घोषणा

राजापूर : कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन - चार दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समर्थकांमधून देण्यात आली.

याबाबत कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, जनहीत संघर्ष समिती, नाणार, ग्रीन रिफायनरी समन्वय समिती, नाणार, राजापूर तालुका विकास प्रतिष्ठान, राजापूर व राजापूर तालुका समन्वय समिती यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवताना उमेदवार उभा करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. कोकणात औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात क्रांती आणू शकेल, अशा रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे पक्ष व त्यांचे उमेदवार रिंगणात असल्याने प्रकल्प समर्थकांमधून विरोधाच्या तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत.

या मतदारसंघाला रोजगाराची नितांत गरज आहे. मात्र, तो आणला गेला नाही. उलट कोकणात आलेले प्रकल्प विनाशकारी ठरवून त्यांना विरोध केला गेला. त्यापैकी एक रिफायनरी असून, आमची रोजीरोटी हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. या भावनेतून प्रकल्प समर्थक संघटनांनी निर्धार करीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या समर्थकांनी बोलताना सांगितले.

रिफायनरीच्या रुपाने आलेली रोजीरोटी हिरावून घेणाऱ्यांना मतदान करायचे नाही. त्याऐवजी प्रकल्पाला समर्थन म्हणून आपला उमेदवारच उभा करायचा, असा जोरदार निर्णय प्रकल्पसमर्थक संघटनांनी घेतला आहे. दोन-चार दिवसांत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Refineries in Konkan region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.