उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO
By अरुण आडिवरेकर | Published: September 12, 2022 12:29 PM2022-09-12T12:29:17+5:302022-09-12T12:36:55+5:30
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला.
रत्नागिरी: रिफायनरी विरोधकाने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच जोशी नामक रिफायनरी विरोधकाने धमकी दिली. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जोशी नामक रिफायनरी विरोधकाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका केली. कोणतरी मंत्री सांगतोय, कोण तरी कंपनी आणून टाकतोय, असे सांगून मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, असे खळबळजनक विधान केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.
VIDEO : रिफायनरी विरोधकाने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच जोशी नामक रिफायनरी विरोधकाने धमकी दिली. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.#Udaysamant#ratnagiripic.twitter.com/wYGoI2pXMK
— Lokmat (@lokmat) September 12, 2022
या धमकीची पोलिसांनीही गंभीर दखल घेतली असून, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनीही लक्ष घातले आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी गंभीरपणे दखल घेत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चाही केली आहे.