शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णांचे पावसाळ्यात पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:10+5:302021-06-25T04:23:10+5:30
लांजा : लांजा शहरामध्ये गेली अनेक महिने मनोरुग्ण पुरुष व एक महिला फिरत आहे. सध्या कोरोना महामारी सुरू असून, ...
लांजा : लांजा शहरामध्ये गेली अनेक महिने मनोरुग्ण पुरुष व एक महिला फिरत आहे. सध्या कोरोना महामारी सुरू असून, मुसळधार पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या पाण्यात भिजत दोघेही शहरात बेवारसपणे फिरत आहेत. दोन्ही मनोरुग्णांना सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी लांजा येथील शिवरायांचे मावळे या संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
शिवरायांचे मावळे या संस्थेतर्फे याबाबतचे निवेदन लांजा पोलीस स्थानकाला देण्यात दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक अनाथ बेवारस महिला व एक पुरुष शहरात फिरताना दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलेच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था होत नाही. नागरिक, व्यावसायिक व प्रवासी यांच्याकडे पैसे मागून किंवा रस्त्यात, आजूबाजूला पडलेले पदार्थ खाऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. एक महिला म्हणून तिचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य ती दखल घेऊन येथील प्रशासनाने महिलेला सहकार्य करावे, असे म्हटले आहे़. हे निवेदन शिवरायांचे मावळे संघटनेचे संतोष जाधव, चंद्रशेखर धावणे, दाजी गडहिरे, सोहेल घारे यांनी दिले आहे.
--------------------------------
लांजा शहरात बेवारसपणे फिरणाऱ्यांची पावसाळ्यात व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन शिवरायांचे मावळे संस्थेतर्फे लांजा पाेलिसांना देण्यात आले़