लाॅकडाऊन शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:32+5:302021-04-14T04:28:32+5:30
मंडणगड : कोरोनामुळे शासनाने निर्बंध घालताना दोन दिवसांचे वीकेंड लाॅकडाऊन घोषित केले होते. मात्र, दुर्गम परिस्थितीचा विचार करून लाॅकडाऊनचे ...
मंडणगड : कोरोनामुळे शासनाने निर्बंध घालताना दोन दिवसांचे वीकेंड लाॅकडाऊन घोषित केले होते. मात्र, दुर्गम परिस्थितीचा विचार करून लाॅकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. श्री संत सेना महाराज नाभिक समाज उत्कर्ष मंडळातर्फे सलून व्यावसायिकांचे व्यवसाय संकटात आला असून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
वीज उपकरणे जळाली
राजापूर : शहराजवळील कोंढेतड गाडगीळवाडी भागात रविवारी उच्चदाबाने झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे काही ग्रामस्थांची विविध इलेक्ट्राॅनिक्स उपकरणे जळून खाक झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ‘महावितरण’च्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.
ऑनलाईन निबंध स्पर्धा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटासह शिक्षकांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.
डांबर प्लँट बंदची मागणी
खेड : तालुक्यातील माणी-सवणेी-बाैद्धवाडीलगत गेल्या २० वर्षांपासून विनापरवाना डांबर प्लँट सुरू आहे. ग्रामपंचायतीने डांबर प्लँट बंद करण्याचा ठराव केला असतानाही प्लँट मात्र निर्धोकपणे सुरू आहे. प्लँटलगत पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहे. तातडीने प्लँट बंद करण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुरूस्तीची मागणी
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावासह इतर गावे महामार्गाला जोडणाऱ्या तांबेडी घाट रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तातडीने हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. संगमेश्वर, कसबा, फणसवणे बाजारपेठेत येण्यासाठी तांबेडी, अंत्रवली, फणसवणे मार्गाचा उपयोग होतो.
पीक प्रात्यक्षिक
रत्नागिरी : जिल्ह्यात शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या राज्य शासनाच्या योजनेनुसार जिल्ह्यात आत्मा अंतर्गत ६७५ भाजीपाला पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. जिल्ह्यातील ५२८ ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू केली आहेत. शेतकरी ग्राहकांशी थेट जोडले गेले आहेत. आंबा विक्रीसाठीही त्याचा फायदा होणार आहे.