रत्नागिरीकरांना दिलासा, ३२ अहवाल निगेटिव्ह; - संगमेश्वरातील ९ जण - कळंबणीतील २३ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 02:03 PM2020-04-17T14:03:28+5:302020-04-17T14:04:09+5:30
खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत
रत्नागिरी : रत्नागिरीकरांना कोरोनाच्या भीतीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्हा रूग्णालयाला शुक्रवारी तब्बल ३२ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये संगमेश्वर येथील ९ रूग्ण आणि कळंबणी येथील २३ रुग्ण यांचे अहवाल आहेत.
जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठवले जात आहेत. मिरज येथून तपासणी अहवाल दोन दिवसात जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होत आहे. शुक्रवारी ३२ अहवाल मिरज येथून प्राप्त झाले आहेत. या ३२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २३ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.