सांजसोबत प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:03+5:302021-08-25T04:36:03+5:30

चिपळूण : तालुक्यात गेली चार वर्षे निराधार वृद्धांसाठी मदतकार्य करणाऱ्या संस्थेच्या व्यापक जनसंपर्कामुळे चिपळुणात पूरस्थितीची माहिती अनेकांपर्यंत पोहाेचली. कराड, ...

Relief work for flood victims from Pratishthan along with Sanj | सांजसोबत प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य

सांजसोबत प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य

googlenewsNext

चिपळूण : तालुक्यात गेली चार वर्षे निराधार वृद्धांसाठी मदतकार्य करणाऱ्या संस्थेच्या व्यापक जनसंपर्कामुळे चिपळुणात पूरस्थितीची माहिती अनेकांपर्यंत पोहाेचली. कराड, पुणे, नाशिक आदी भागांतून आलेली मदत सांजसोबत प्रतिष्ठानशी जोडलेल्या सर्वांनी पूरग्रस्तांना दिला. कार्यकारिणी सभेत कार्याध्यक्ष पराग वडके यांनी त्याचा परिपूर्ण अहवाल मांडला.

अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी आपली संस्था अनेक परजिल्ह्यातील संस्थेशी विश्वासाने जोडली गेली. कष्टकरी महिलांना, छोटे व्यावसायिक यांना केवळ वस्तूरूप मदत देण्यापलीकडे जाऊन त्याला योग्य वाटेल असे पाठबळ देणे गरजेचे आहे. बँका त्यांना कर्ज देताना अनेक कागदपत्रांची मागणी करीत असल्याने दयनीय अवस्था झाल्याची चर्चात्मक माहिती सचिव अशोक भुस्कुटे यांनी समोर आणली. पुढील काळात संस्थेच्या क्षमतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक वल्लवी करमरकर यांनी पोलीस सेवा बजावताना पूरस्थितीत केलेल्या कामाचा गौरव करीत सर्वांनी सत्कार केला. सुभाष केळकर, अभय अंतरकर, नेत्रा पाटील, संजय सुर्वे आदी उपस्थित होते.

Web Title: Relief work for flood victims from Pratishthan along with Sanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.