भारनियमनातून दोन दिवस सुटका, वीजग्राहकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:55 PM2017-10-09T15:55:13+5:302017-10-09T15:55:20+5:30

कोळशाअभावी वीजनिर्मितीमध्ये झालेली घट त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठ्यामध्ये निर्माण झालेली तफावत भरून काढण्यासाठी दि.४ पासून राज्यात सर्वत्र भारनियमन सुरू आहे. मात्र शनिवारपासून भारनियमन बंद करण्यात आल्याने ग्राहकांना शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दिलासा मिळाला होता.

Relieved for two days from the weightlifting, relief to electricity consumers | भारनियमनातून दोन दिवस सुटका, वीजग्राहकांना दिलासा

भारनियमनातून दोन दिवस सुटका, वीजग्राहकांना दिलासा

Next
ठळक मुद्देशनिवारी, रविवारी भारनियमन न झाल्याने ग्राहकांना दिलासा

रत्नागिरी,9 : कोळशाअभावी वीजनिर्मितीमध्ये झालेली घट त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठ्यामध्ये निर्माण झालेली तफावत भरून काढण्यासाठी दि.४ पासून राज्यात सर्वत्र भारनियमन सुरू आहे. मात्र शनिवारपासून भारनियमन बंद करण्यात आल्याने ग्राहकांना शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दिलासा मिळाला होता.

दि. ६ रोजी ए व बी ग्रुप वगळता सी, डी, ई, एफ व जी १, जी २, जी ३ गटातील फिडर्सवर तात्पुरते भारनियमन करण्यात आले.  सोमवारी देखभाल, दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा काही तास बंद ठेवण्यात आला.

सध्या भारनियमन तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. शनिवारी, रविवारी भारनियमन न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. अद्याप तरी भारनियमनाच्या काहीच सूचना नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: Relieved for two days from the weightlifting, relief to electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.