कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:20 PM2021-11-17T16:20:08+5:302021-11-17T16:20:36+5:30

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

Remarkable performance during Corona period special award to District Collector of Ratnagiri | कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

Next

रत्नागिरी : कोविड-१९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

हा सन्मान माझ्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हावासीयांचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.

दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख ४२ हजार ०६१ जणांनी लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य पथकांद्वारे विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मात्र नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोकणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामानात मोठे बदल होत आहे. थंडी, ऊन आणि पाऊस असे वातावरण असल्याने नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

Web Title: Remarkable performance during Corona period special award to District Collector of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.