अक्षय कदम प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:44+5:302021-07-07T04:38:44+5:30

रोपांची लागवड दापोली : दापोली-दाभोळ मार्गावरील जालगाव ते मळे दरम्यान वनविभागाकडून तब्बल १ हजार रोपांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला ...

Renewable steps first | अक्षय कदम प्रथम

अक्षय कदम प्रथम

Next

रोपांची लागवड

दापोली : दापोली-दाभोळ मार्गावरील जालगाव ते मळे दरम्यान वनविभागाकडून तब्बल १ हजार रोपांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते काजूचे रोप लावून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील आदी उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन

चिपळूण : भारतीय जनता पार्टीतर्फे चिपळूण येथे दहावी-बारावीचे विद्यार्थी, पालकांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन केले आहे. दिनांक ६ जुलै रोजी दहावीच्या मुलांसाठी, तर दिनांक ७ जुलै रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वेबिनार होणार आहे.

पायधन यांचा सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काळबादेवीचे ग्रामसेवक शिवकुमार पायधन यांची बदली झाल्याने त्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. पायधन यांनी या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे चांगली सेवा केली होती. यावेळी सरपंच तृप्ती पाटील, उपसरपंच सुमीत भोळे आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजनेची मागणी

रत्नागिरी : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू झाली पाहिजे यासाठी लढा देणार असल्याची माहिती शिक्षण संघर्ष संघटनेच्या जुनी पेन्शन कोअर कमिटीचे प्रसिद्धी प्रमुख तथा रत्नागिरी तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली. केळकर यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे स्पष्ट केले.

शंभरजणांचे रक्तदान

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबके येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपसरपंच दाऊद दुदुके, बुराण टाके, रहीम सहीबोले यांच्यासह जनकल्याण रक्तदान केंद्राच्या सहकार्यातून शिबिराचे आयोजन केले होते.

बसची मागणी

खेड : लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेली खेड-बिरमणी बस अद्याप बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी वीरमणी वैचारिक मंचाचे दीपक मोरे यांनी केली असून आगारप्रमुख प्रशांत करवंदे यांना निवेदन सादर केले आहे. दुर्गम भागात वसलेल्या या गावातील ग्रामस्थांसाठी एस. टी. दळणवळणाचे साधन आहे.

नारळ रोपाची लागवड

चिपळूण : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कळंबस्ते येथे ग्रामपंचायत इमारतीच्या परिसरात नारळ रोपाची लागवड करण्यात आली. शेतकरी कुटुंंबांना फणस कलमांची भेट देण्यात आली. यावेळी माजी सभापती शौकत मुकद, सरपंच विकास गावडे, उपसरपंच गजानन महाडिक उपस्थित होते.

लांजेकर यांची निवड

गुहागर : तालुक्यातील झोंबडी येथील माजी सैनिक मनोहर लांजेकर यांचे पुत्र अनिकेत लांजेकर यांची निवड भारतीय सैन्यदलात झाली आहे. सध्या ते बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. अनिकेतच्या माध्यमातून लांजेकर कुटुंबातील तिसरी पिढी सैन्य दलात कार्यरत आहे.

लागवड प्रात्यक्षिक

चिपळूण : सावर्डे गणातील महिला बचत गटाने हळद व आले पिकाची लागवड करावी. यासाठी माजी सभापती पूजा निकम यांनी पुढाकार घेत प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. यावेळी पिकाची लागवड, मशागत, खत व्यवस्थापन, कीड रोप व्यवस्थापन, काढणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

Web Title: Renewable steps first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.