सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

By admin | Published: September 11, 2016 11:12 PM2016-09-11T23:12:36+5:302016-09-11T23:18:20+5:30

राजापूरची पाणीटंचाई मिटणार : दहा कोटींचा खर्च अपेक्षित

Report to Saiba dam report to the government | सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

Next

 राजापूर : गेली १३८ वर्षे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाची पाहणी करून तयार केलेला संयुक्त अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, त्यानुसार सध्याच्या धरणाच्या जागी पंधरा हेक्टर जमीन क्षेत्रात दीडशे मीटर लांब व पंधरा मीटर उंच मातीचे धरण आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
गेली अनेक वर्षे राजापूर शहराला ब्रिटिशकालीन धरणातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सायबाचे धरण अशीही त्याची ओळख आहे. धरणाला गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा महिने शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. सन २०११च्या जनगणनेनुसार राजापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार सातशे त्रेपन्न एवढी आहे. पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करता या शहराची लोकसंख्या पंधरा हजारच्या घरात जाऊन पोहोचण्याची शक्यता गृहीत धरता १३५ लीटर प्रतिव्यक्ती व प्रकल्पातील लिकेजीस आणि लॉसेस लक्षात घेता २.४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता लागेल. पावसाळावगळता दोनशे सत्तर दिवसांसाठी सहाशे छप्पन दशलक्ष लीटर एवढी पाण्याची गरज लागेल, याचा अंदाज घेऊनच धरणाबाबतचा तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Report to Saiba dam report to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.