गणपतीपुळेमध्ये बुडणाऱ्या चार पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:22 PM2018-12-29T15:22:33+5:302018-12-29T15:35:50+5:30

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. 

rescued survivors four people drowning ganpatipule beach | गणपतीपुळेमध्ये बुडणाऱ्या चार पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले

गणपतीपुळेमध्ये बुडणाऱ्या चार पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले

Next
ठळक मुद्देगणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला.किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. धानोरी पुणे येथील विकास वाघमारे आणि सिद्धासम भगळे तसेच सिडको औरंगाबाद येथील पवन वहाबकर आणि मयुर गिरे हे शनिवारी पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले.

गणपतीपुळे  - गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील चौघेजण समुद्रात बुडत असल्याचा प्रकार शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांना चौघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे. 

धानोरी पुणे येथील विकास वाघमारे (25) आणि सिद्धासम भगळे (34) तसेच सिडको औरंगाबाद येथील पवन वहाबकर (21)आणि मयुर गिरे (18) हे शनिवारी पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आपल्या ग्रुपसमवेत आले. पोहण्यासाठी म्हणून ते समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून जीवरक्षक रोहीत चव्हाण, विशाल निंबरे, विक्रम राजवाडकर, अनिकेत मयेकर, मिलिंद माने, उमेश म्हादये आणि अनिकेत राजवाडकर यांनी त्या चौघांना वाचवले.

Web Title: rescued survivors four people drowning ganpatipule beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.