ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेत १६ जागा ओबीसींना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:12 PM2022-07-29T18:12:38+5:302022-07-29T18:13:32+5:30

जिल्हा परिषदेच्या एकूण ६२ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली

Reservation announced for total 62 seats of Ratnagiri Zilla Parishad | ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेत १६ जागा ओबीसींना

ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेत १६ जागा ओबीसींना

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या एकूण ६२ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ३१ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्केप्रमाणे १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तेजस्विनी पाटील आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पूजा पाष्टे या मुलीने काढल्या. निवडणूक निर्णय विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यातील ८ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे.

या आरक्षणानुसार केळशी, अलोरे, वाटद, दाभोळ, ताम्हाणे, शुंगारतळी, पालगड, उसगाव, पडवे, कोतवडे, पावस, साडवली, विरांचीवाडी, लोटे, धामणदेवी, वेळणेश्वर, नाचणे, धामापूर तर्फ संगमेश्वर, कोसुंब, तळवडे हे गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारणमध्ये जालगाव, दयाळ, शिरळ, पेढे, शिरगांव, सावर्डे, खेर्डी, उमरोली, वहाळ, निवळी, कोकरे, असगोली, कुवारबाव, गोळप, कनकाडी, दाभोळे, भांबेड, साठवली, केळवली, कशेळी, जुवाठी या गटांचा समावेश झाला आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी इस्लामपूर, बाणकोट, भरणे, कसबा, करबुडे, झाडगाव, कोंडकारूळ, कातळी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी भिंगळोली, कडवई, खालगाव, हातखंबा, खेडशी, साखरीनाटे, धामपूरतर्फ संगमेश्वर, माभळे, टेटवली हे गट आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सुकिवली तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आसगे, अनुसूचित जातीसाठी भडगाव, गव्हाणेचा समावेश आहे.

आक्षेप धरले ग्राह्य

आरक्षण प्रक्रियेनंतर कोकरे गटाचे आरक्षण गतवेळी सर्वसाधारण महिला असतानाही यावेळी पुन्हा महिला काढण्यात आल्याचा आक्षेप संतोष चव्हाण यांनी घेतला होता. उमरोली गटाबाबतही तीच सूचना करण्यात आली. दोन्ही सूचनांची उलट तपासणी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी तत्काळ केली. त्यात दोन्ही आक्षेप ग्राह्य असल्याचे निदर्शनास आले. आरक्षणाविषयीच्या हरकती पुढील तीन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत.

असे आहे आरक्षण

सर्वसाधारण महिला- २०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण- ८, अनुसूचित जाती महिला- २, अनुसूचित जाती सर्वसाधारण- १, अनुसूचित जमाती महिला- १. याखेरीज २२ गट सर्वसाधारण म्हणून खुले आहेत.

Web Title: Reservation announced for total 62 seats of Ratnagiri Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.