आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:08+5:302021-06-22T04:22:08+5:30
हळद लागवड प्रात्यक्षिक दापोली : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शहरानजीकच्या कोकंबा आळी येथील ऋता भागवत ...
हळद लागवड प्रात्यक्षिक
दापोली : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शहरानजीकच्या कोकंबा आळी येथील ऋता भागवत यांच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित मसाला पिके संशोधन योजना यांच्यातर्फे पाच गुंठे जागेत हळद लागवड प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
इंधन दरवाढ सुरूच
रत्नागिरी : पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल ३० पैशांनी वाढले आहे. पेट्रोलने शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल दर शंभरच्या घरात आले आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहने चालविणे अवघड बनले आहे.
कृषी संजीवनी मोहीम
रत्नागिरी : तालुक्यातील पाली मंडल कृषी कार्यालयाच्या अखत्यारितील गावांमध्ये कृषी संजीवनी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. नऊ गावांमध्ये दि.१ जुलैपर्यंत हा कार्यक्रम राबविताना चर्चासत्र, मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आयोजित केली आहे. कृषी विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, बागायतदारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती सभा
चिपळूण : पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ही सभा तहकूब करण्यात आली असून आता ती दि.२३ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुसळधार पावसामुळे नेटवर्कअभावी अनेक सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत.