रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:40 PM2019-12-11T12:40:44+5:302019-12-11T12:41:36+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे.
जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापतींची मुदत लवकरच संपणार असल्याने या पदांसाठी बुधवारी सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २८ नोव्हेंबर २०१९ सोबत प्राप्त अधिसूचना २७ नोव्हेंबर २०१९ मधील सूचनांनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली.
या सोडतीमध्ये जिल्ह्यातील ९ पंचायत समितीच्या सभापती पदामध्ये मंडणगड - ओबीसी स्त्री (ना. मा. प्र. स्त्री), लांजा - ओबीसी (ना. मा. प्र.) असे आरक्षण पडले आहे. तर राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण पंचायत समिती सभापती पद स्त्री सर्वसाधारण, आणि संगमेश्वर, खेड व दापोली या तीन पंचायत समितींचे सभापती पद खुले झाले आहे.