परप्रांतीय नागरिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्था- रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाकडून निवारागृहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:17 PM2020-04-16T14:17:50+5:302020-04-16T14:19:47+5:30
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
रत्नागिरी : लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्यात असणाऱ्या परप्रांतातील नागरिकांच्या निवास व भोजनाची सुविधा जिल्हा प्रशासनाने केली आहे. या ठिकाणी इतर परप्रांतीयांना संपर्क साधता येईल. एकूण ५४ निवारा गृह जिल्ह्यात आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून, जिल्हा प्रवेशाला ही बंदी आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुका : मिरजोळे नर्सिंग कॉलेज - मंडल अधिकारी चिखरीकर, सर्वसाक्षी हॉल वाटद - मंडल अधिकारी शीद, निरुळ जिल्हा परिषद शाळा क्र.१ - मंडल अधिकारी सरफरे, दैवज्ञ भवन, नाचणे रोड - मंडल अधिकारी चव्हाण, पावस भक्त निवास - मंडल अधिकारी पारकर, आदर्श शाळा, पूर्ण प्राथमिक शाळा नं. १, पाली - मंडल अधिकारी कांबळे, न्यू इंग्लिश स्कूल नेवरे - मंडल अधिकारी कांबळे.
संगमेश्वर तालुका : कोळंबे हायस्कूल, कोळंबे, संगमेश्वर - मंडल अधिकारी गमरे, तुळसणी हायस्कूल, तुळसणी, संगमेश्वर - मंडल अधिकारी पाटील, महात्मा गांधी विद्यालय, साखरपा, संगमेश्वर - मंडल अधिकारी दामले, आठल्ये-सप्रे कॉलेज, देवरुख - मंडल अधिकारी शिवगण, दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरोंबी, संगमेश्वर - मंडल अधिकारी मांडले.
राजापूर तालुका : कला मंदिर राजापूर हायस्कूल, राजापूर - मंडल अधिकारी पंडीत, सभागृह, नगरवाचनालय, राजापूर - तलाठी कोकरे, विश्वनाथ विद्यालय, राजापूर - तलाठी गोरे, कन्या विद्यालय, राजापूर - तलाठी राठोड, एस. टी. पीक अप शेड, नगर परिषद, राजापूर, निर्मल भिडे जनता विद्यालय कोंडे तर्फे सौंदळ - कृषी सहाय्यक इडोळे, जिल्हा परिषद शाळा वाघ्रण, राजापूर - कृषी सहाय्यक डांगमोडे, आदर्श विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय वाटूळ, राजापूर - कृषी सहाय्यक सोनकांबळे, जिल्हा परिषद शाळा वाटूळ क्रमांक १ आणि २, वाटूळ, राजापूर - कृषी सहाय्यक सोनकांबळे, जिल्हा परिषद शाळा कोळम्ब क्र. १, राजापूर - कृषी सहाय्यक कदम, जिल्हा परिषद शाळा चिखलेवाडी क्र. २ चिखलेवाडी, राजापूर- कृषी सहाय्यक चौधरी.
लांजा तालुका : आरमीन ऊर्दू हायस्कूल लांजा - उपअभियंता वैभव शिंदे.
खेड तालुका : सहजीवन हायस्कूल खेड - गटविकास अधिकारी पारशे, एल पी इंग्लिश स्कूल खेड - मुख्याधिकारी शिंगटे, मुकादम हायस्कूल खेड - कृषी अधिकारी काजी, एम आय बी गर्ल्स हायस्कूल खेड - उपविभागीय अधिकारी नातूवाडी प्रकल्प, खेड मांगले, नवभारत हायस्कूल भरणे, भरणे - खेड - मंडल अधिकारी क्षीरसागर जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, भरणे - भरणे खेड - मंडल अधिकारी मिरगावकर, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा खेड क्र. ३, खेड - मंडल अधिकारी लाड.
चिपळूण तालुका : जिल्हा परिषद शाळा खेर्डी, दातेवाडी खेर्डी चिपळूण - गटविकास अधिकारी जाधव, जिल्हा परिषद शाळा वालोपे क्र. १, वालोपे , चिपळूण - मंडल अधिकारी अहिर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाग मुला मुलांची पाग, चिपळूण - प्रशासकीय अधिकारी नगरपालिका चिपळूण अनंत मोरे, एल टाईप शॉपिंग सेंटर, चिपळूण नगरपरिषद, चिपळूण - प्रशासकीय अधिकारी नगरपालिका चिपळूण प्रमोद ठसाळे, मुलांची शाळा मराठी पेठमाप, चिपळूण, पेठमाप चिपळूण - मंडल अधिकारी गिरजेवार, तालुका क्रीडा संकुल खरवते, - मंडल अधिकारी मिलिंद ननाळ.
गुहागर तालुका : खरे - ढेरे - भोसले महाविद्यालय गुहागर - तलाठी गुहागर, गोंबरे शाळा, गुहागर - तलाठी गुहागर, गोपाळकृष्ण विद्यामंदिर, गुहागर - तलाठी गुहागर.
दापोली तालुका : आर.आर. वैद्य इंग्लीश मिडीयम स्कूल, दापोली - मंडळ अधिकारी खानविलकर, ए.जी. हायस्कूल, दापोली - मंडल अधिकारी परडाल, प्रियदर्शिनी हॉस्टेल, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (मुले) - मंडळ अधिकारी पांडये, प्रियदर्शिनी हॉस्टेल, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (मुली) - मंडल अधिकारी गुरव, एन. के. वराडकर कॉलेज, दापोली - मंडल अधिकारी आंजर्लेकर.
मंडणगड तालुका : श्रीकृष्ण सभागृह, भिंगळोली, - नायब तहसीलदार मंडणगड, कुणंबी भवन, मंडणगड, - मंडल अधिकारी खांबकर, साठे सभागृह कोनझार, - मंडल अधिकारी मोरे, जिल्हा परिषद शाळा शेनाळे, - मंडल अधिकारी, मराठा भवन, धुत्रोळी, - तलाठी पंडीत, जिल्हा परिषद शाळा, तुळशी - तलाठी पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाट - तलाठी अदक, नूतन विद्यामंदिर मंडणगड - तलाठी गायकवाड, जिल्हा परिषद शाळा म्हाप्रळ, नवानगर, मंडणगड - नायब तहसीलदार मंडणगड.